Tuesday 19 April 2016

JAINISM-The truth

Dashratha,the king of Saketa(ahyodya) had four queens Aparajita,Sumitra,Suprabha and Kaikeyi.These four queens had four sons.Aparajita's son was Padma and he became known by the name Rama.Sumitra's son was Narayana he became to be known as Lakshmana.Kaikeyi's son was Bharata and Suprabha's son was Shaturghna.Rama had four queens Maithili,Prabhavati,Ratinibha and sridama.

Lakshman was a student of Mareesa,uncle of Ravana from whom he learnt mantras and tactics.While doing so Lakshman met Soorpanaka,Ravan's sister and fell in love for her beauty.Then he was married to her.After he returned to Ayodhya, he abandoned her and when they were on vanvasa she came to him and he refused to accept her.Then Ravan was angry and to teach a lesson of pain of love he took Sita and demanded justice for his sister.

Hanuman is relative of Ravana belonging to rakshasa clan.He is married to Ravana's niece.Ravana made him king of nearby island called Hanugraha and hence his name got changed.Looking at his deeds Ravana sends him to mainland where he initially try to conquer Kishkinda.Seeing at might of Hanuman,Vali offered him friendship.Vali wanted to go in spiritual path to become a jain monk,and installs Sugriv as his successor in Kishkinda.Sugriv offer Hanuman a position in his kingdom.Hanuman get married to few of relatives of Sugriv.This is when Rama and Lakshmana approaches Sugriv for help.Hanuman reaches to Lanka and urges Ravana to return Sita,but he could not convince.In the meantime  Sugriv and Ram make alliance to fight Ravana.When Hanuman returns from Lanka,they were ready for the war at south coast.Then Hanuman had no choice other than fighting alongside Sugriv.Lakshman killed Ravana.

Sita takes renunciation as a jain ascetic after Ram abandons her and reborn in heaven.Ram also after Lakshmanas death renounces his kingdom and becomes a jain monk.Ultimately he attain kevala jnana omniscience and attain libration.Ram predicts that Ravana and Lakshmana who were in fourth hell will attain liberation in their future birth.Accordingly Ravana will be future tirthankara and Sita will be his ganadhara(chief disciple)

You must be amazed or shocked after reading story of Ramayan.But i am not a writer and definitely not fiction stories.This is Jain version of Ramayan.Other than jain there are many versions of Ramayana like Srilankan ,south asian,buddhist,sikh and nepali.I personally believe that epics like Ramayana were not written as facts of history or something that actually happened ,they were written to inspire people Rama and Ravana may or may not have existed but they definitely are symbolic of good and evil.

My personal belief about jainism was that like buddhism ,jainism also emerges from hindu religion but thats not true because basically jains are not aryans and after excavation in 1890 archiologist found seal of jainis which prooved that jainism is religion of ancient India during indus valley civilisation era.  Second  president of India Sarvepalli Radhakrishnan was of the opinion that jainisn was in existence long before vedas were composed.
''There is evidence to show that so far back as the first century B.C. there were people who were worshipping Ṛṣabhadeva, the first tīrthaṅkara. There is no doubt that Jainism prevailed even before Vardhamāna or Pārśvanātha. The Yajurveda mentions the name of three Tīrthaṅkaras-Ṛṣabha, Ajitnātha and Ariṣṭanemi. The Bhāgavata Purāṇa endorses the view that Ṛṣabha was the founder of Jainism.''
— Dr. S. Radhakrishnan(Ex President of India) 


History of Jainism

Its said that 22nd Tirthankara of jain Neminath was Krishna's cousin.Tirthankara means head or dharmguru or God.  23rd Parshvnath(877-772BC) and last 24th Tirthankara was MAHAVIR(599-572BC) First Tirthankara was Rishbhanatha and about him there is mention in rigveda who is founder of jainism.

 Mahavir and Gautam Buddha were from same period. King of Magadha Bindisara( laid foundation for mauryan empire) who met Gautam Buddha prior to enlightenment and later become disciple of Buddha.  Bindisara also frequently visited samavasaran(preaching hall) of Mahavir seeking answers for his questions. Bindusara asked Mahavira true version of Ramayana.

Chandragupta Maurya(324-297BC),the founder of mauryan empire in later age become disciple of Jainism. His son Ashoka(268-232BC) become Buddhist and Ashoka's grandson Samprati(224-215BC) converted to Jainism.This was the period when all three religions hindu,jain and buddhism tried to convert people .Till 8th century AD buddhist and jain were majority and hindus were minority.  South India upto sangli and kolhapur in maharashtra was mostly jains.

Jain Temples
Jainism spread to south india and they build many temples. According to All India jain minority forum many temples of south India were actually jain temples but during 8th and 11th century its converted to hindu temples.One of the main temple of south India Tirupati Balaji and Other temples claims by Jain minority were built by jains.Other temples are 

1.  Madurai Meenakshi temple
2. Kanchipuram kamakshi temple and 100 temples in kanchipuram
3. Varadperumal temple(kanchipuram)
4. Thiruvanmalai Arunachalam temple
5. Mylapore kapaliswara temple
6. Nagaraja temple nagercoil

 Mahalakshmi temple,kolhapur is hindu temple now but jains claim that it was built by nimbadeva and you can see 72 jinas carved on shikhar of the temple .Belgaon,Kolhapur and Sangli are 3 among top 5 districts of India in terms of jain population even today.Historically 30% population was jain during Rashtrkut empire when ellora caves were constructed by jains.

According to blog of  jain community

Thamizh(tamil language) existed in India amongst the Dravidians several thousands of years before. Sanskrit was a language that was brought by Aryans those who entered India through the Kyber and bholan passes. Sanskrit is as such, much younger language than Thamizh. Thousands of words were borrowed from Thamizh into Sanskrit. Few examples are neer (water) and meen (fish). The linguistic research work done by the two greatest English linguists Caldwell and Burrow proves this fact that, Sanskrit has borrowed words heavily from Thamizh.

Dandin the author of the Kavyadarga in Sanskrit, was a scholar from Kanchipuram in the Tamil Nadu. Sankara the exponent of Advaita philosophy, was again a Tamilian. He mentioned in his works Saint Njanasampantar, the crusader against Jainism in South India. Raamanujar, the originator of Visishtaadvaita philosophy was a Tamilian and he lived every close to Kanchipuram.These scholar borrowed tamil words.

Around 8th century Indian kingdoms  were divided among Buddhism,Jainism and Hindusm.Adi shankara in 8th century and Ramanuja in 11th century revived hinduism.They converted many kings who were jain in south to hinduism and jain temples into hindu temples.

Jain religion being non violence did nothing to prevent from conversion.Adi shankarachary and Ramanuja revived hinduism around 8-11th century.As per jain community blog and wikipedia ,around 7th century Sambandar vedic scholar and saint from tamilnadu converted pandyan king koon pandiyan from jainism to hinduism and then with consent of Sambandar  king massacred around 8000 jains.

2011 census shows that jain population in India is 0.37% ie 44.51 lacs.94% are literate and wealthy.


This article is just information but....
Being Indian I must know India better
My opinions change with new information.
What about you ???





reference

Please go through these sites for more information



wikipedia

Thursday 14 April 2016

UNTOUCHED INDIA

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून हा लेख लिहित आहे

आज सोशिअल मिडियावर बाबासाहेब आणि त्यांच्या कार्याबद्दल बरेच मेसेज आले पण त्या कार्याचे पुढे काय झाले याचा उल्लेख नाही . अस्पृश्यता दूर झाली का?जातीव्यवस्था आणि चातुरवर्ण यातील फरक काय आहे हे लोकांना समजले कां ?समानता आली कां ?भारताचे भवितव्य काय आहे ?या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा एक प्रयत्न……. 

हिंदू धर्मातून बाहेर पडून जैन,बौद्ध आणि शीख या धर्मांची स्थापना झाली पण जाती व्यवस्थेमुळे या धर्मांची स्थापना झाली असा कुठेही उल्लेख नाही . वेदांमधील काही प्रकार उदा . मृत्युनंतर जे विधी असतात किंवा कालसर्प शांती आणि इतर शांती वगैरे या रूढी धर्मकर्म  मान्य नसल्याले जैन,बौद्ध धर्मांचा उगम झाला. नंतर अशोकानेही जातिव्यवस्थेमुळे किंवा अस्पृश्तेमुळे बौद्ध धर्माचा स्वीकार आणि प्रचार केला असे हि इतिहासात कुठेही नाही.  उझ्बेकीस्थांचा (uzbekistan) Al-Biruni (Alberuni, A.D. 973-1048) या विचारवंत आणि इतिहासकाराने पहिल्यांदा जातीव्यवस्थेवर लिखाण केले आहे . लिंक खाली दिली आहे . 


त्यामुळे त्यादरम्यान म्हणजे साधारण १०००AD वर्षापासून जातीव्यवस्थेला सुरवात झाल्याचे मानायला हरकत नाही. त्यानुसार देवाच्या मुखातून ब्राह्मण ,हातातून क्षत्रिय ,मांडीतून वैश्य आणि पायातून शूद्रांचा उगम झाला असे मानायला सुरवात झाली आणि आताचे धर्मगुरूही तेच मानतात. पण वेदांनुसार देव निर्विकार म्हणजे कुठलाही आकार नसलेला आहे तर मुखातून आणि पायातून उगम कसा होईल ?

यजुर्वेदातील अध्याय ३१. १० पुरुषसुक्तानुसार देवाने यज्ञातून पुरुष बनवला त्याचे  मुख(head)म्हणजे ब्राह्मण हात(shoulder)म्हणजे क्षत्रिय ,मांड्या म्हणजे वैश्य ,आणि पायम्हणजे शुद्र  बनवले आणि संपूर्ण पुरुष बनवला. कुठलाही एक अवयव नसेल तर पूर्ण पुरुष होत नाही 
मराठीत अर्थ श्लोक १०वाचा 
यजुर्वेद अध्याय ३१



















या चारपैकी जो ज्ञान संपादन करेल तो मुख म्हणजे ब्राह्मण ,ज्याच्या बाहूत शक्ती असेल तो क्षत्रिय ,जो अर्थार्जन करेल तो वैश्य आणि जो कष्ट करू शकतो तो शुद्र म्हणजे पाय . गीतेतही अध्याय ४ मधील श्लोक १३ मध्ये उल्लेख आहे

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश: 
तस्य कर्तारमपि मां विद्धयकर्तारमव्ययम  
(ब्राह्मण ,क्षत्रिय ,वैश्य आणि शुद्र या चार वर्णांचा समूह ,गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे . )

प्रत्येकाच्या वर्णानुसारआणि कर्मानुसार जगण्याचा उल्लेख आहे. (जातीनुसार नाही )

पुराणातील उदाहरणे द्यायची झाली तर 

१    आयत्रेय ऋषी,सत्यकाम जबल  ज्ञानार्जनामुळे दासीपुत्र असूनही कर्मानुसार  ब्राह्मण आहेत 
२    व्यास ऋषी शुद्र कोळ्याच्या मुलीचा सत्यकामाचा मुलगा आहे पण कर्मानुसार  ब्राह्मण आहेत 
३    धृतराष्ट ,पंडू हे ब्राह्मण व्यास ऋषींचे पुत्र पण कर्मानुसार क्षत्रिय 
४    विदुर दासीपुत्र पण कर्माने ब्राह्मण 

इतिहासात पेशवे जन्माने ब्राह्मण असले तरी कर्माने क्षत्रिय होते असे मानले जाते पण त्याच पेशव्यांचा पराभव आणि  शेवट ज्या battle of koregaon  मध्ये East India Company च्या महार रेगीमेंट ने केला त्यांना कुणीही क्षत्रिय म्हणणार नाही . 
koregaon victory pillar 

 काही स्वार्थी लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि आपल्या पुढल्या पिढ्यांना अधिकार कायम ठेवण्यासाठी जन्मानुसार जातीव्यवस्था चालू ठेवली . पार्ल्यात रहाणारे जोशीगुरुजी पौराहित्य करतात त्यामुळे ते गुण आणि कर्मानुसार  आणि घाटकोपरच्या आंबेडकर नगरातील कांबळेकाका महानगरपालिकेत झाडूखात्यात काम करतात म्हणून ते शुद्र हे समजू शकतो. 

जोशीगुरूजीना ४ मुले आहेत. मोठा मुलगा पीएचडी करून IIT त प्रोफेसर आहे ,दुसरा मुलगा नेवीत कॅप्टन आहे,तिसऱ्या मुलाचा बिसनेस आहे आणि चौथा मुलगा बारावी पास करून खाजगी कंपनीत कारकून आहे तरीही चौघेही ब्राह्मण आहेत. आणि कांबळेची ४ मुले  एक शिक्षक दुसरा सेक्युरिटी गार्ड तिसरा भाजी विकतो आणि चौथा नगरपालिकेत झाडूखात्यात काम करतो तरीही चौघेही शुद्र.

हे हिंदू धर्मानुसार नाही आणि त्यात बदल नजीकच्या काळात तरी शक्य नाही. असो पण अस्पृश्तेच काय. महाराष्ट्रात शिवाजी राजे ,महात्मा फुले आणि आंबेडकर यांच्या मुळे अस्पृशता शक्यतो दिसत नाही पण भारतातील इतर राज्यात विशेषतः ग्रामीण भागात आजही हरिजनांना जी वागणूक दिली जाते ते बघायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि युट्युब वरील २ तासांची जी डॉक्युमेंटरी फिल्म आहे ती आवर्जून  बघा. 


ही फिल्म बघितल्यावर आपल्या लक्षात आले असेल की बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म का स्वीकारला कारण स्वातंत्र्यानंतरही  संविधान मध्ये दलितांच्या शोषणा वरून एव्हडे कायदे असूनही दलितांवर जे अन्याय होत आहेत तर आधी काय होत असेल याची कल्पना येते  . या हिंदू धर्मगुरूना आणि स्वतःला राजपूत आणि यादव  म्हणवणार्यांना आणि दलितांवर अन्याय करणार्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तो पर्यंत हे असेच चालणार . हल्लीच द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी वादादित वक्तव्य करून आपली अक्कल पाजळवळी  आहे .रामचरितमानस वाचतानाही तुलसीदासांचा एक श्लोक वाचल्यावर त्यांची मानसिकता लक्षात आली . 

ढोल गवार शुद्र पशु नारी 
सकल ताडना के अधिकारी 

मनुस्मृती मधे जे लिहिले आहे तेही  वाचल्यावर लक्षात येते कि बाबासाहेबांनी त्याचे दहन का केले .सामान्य माणसालाही त्या नियमांचे आश्चर्य वाटेल की हे कोणी लिहिले आणि का लिहिले असतील. 

मी एक हिंदू असूनही मला धर्मातल्या काही परंपरेबद्दल आक्षेप आहेत कारण एका विशिष्ट समुदायाने वर्षानुवर्षे काही गोष्टीवर आपले १००% आरक्षण कायम ठेवले . वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते लपवून ठेवले . वेदांचे वाचन जो करेल त्याचे डोळे फोडायचे आणि जो पठन करेल त्याची जीभ कापायची असे कायदे होते . त्यामुळे एक विशिष्ट समुदायच कायम पुढे राहिला आणि बाकीचे खूपच मागे  राहिले . तेच आरक्षण जेव्हा दुसर्यांना द्यायची वेळ आली तेव्हा social media वरून आरक्षण विरोधी messages फिरायला लागले . 

एका विद्यार्थ्याचे आजोबा पणजोबा काय त्यांच्या ५००० पिढ्या डॉक्टर वैद्य होते आणि एक विद्यार्थी पहिल्यांदाच डॉक्टर बनण्याचे स्वप्न बघतोय तर दोघे एकाच पातळीवर असू शकतील का हा साधा विचार त्यांच्या डोक्यात येत नाही कि त्यांना या गोष्टीची भीती वाटायला लागली आहे कि आपल्या इतक्या वर्षांच्या आरक्षण चे काय ?
वैज्ञानिक दृष्ट्या जरी विचार केला तरी जीन्स आणि DNA मधेही शेकडो वर्षांनी किती फरक होऊ शकतो . 

 नीट विचार केला तर ब्रिटिशानी जेव्हा राज्य केले तेव्हा शूद्रांचे काहीही नुकसान झाले नाही कारण त्यांच्याकडे नुकसान होण्यासारखे काहीही नव्हते त्याउलट फायदाच झाला. महिलांनाहि सती प्रथा बंद झाल्यामुळे प्राण वाचले . ब्रिटीश नसते तर हि प्रथा कधी बंद झाली असती का हा प्रश्न आहे कारण मंदिरात महिलेला  प्रेवेशाची बंदी ही  प्रथा बंद होऊन एक आठवडाच झालाय.  
  
ब्रिटिशानी तेव्हाचे जे महार होते त्यांना आर्मी मध्ये नोकऱ्या दिल्या. बाबासाहेबांचे पूर्वज इस्ट इंडिया आर्मी मध्येच होते आणि त्यांचे वडील रामजी सकपाळ हे तर इंडिअन ब्रिटीश आर्मी मध्ये सुभेदार होते . ब्रिटीश आर्मी मध्ये सुभेदार म्हणजे second highest position. बाबासाहेबहीं  बडोद्याच्या गायकवाडांच्या स्कॉलरशिप वर  २२ व्या वर्षी अमेरिकेत कोलंबिया युनिवर्सिटी मध्ये शिकायला गेले आणि त्यानंतर लंडनला जाऊन economics मध्ये पीएचडी केली. ब्रिटीश आले नसते तर बाबासाहेब कदाचित एव्हडे शिकलेही नसते .

पण तरीही १८५७ च्या लढ्यात भाग घेऊन  २१ आणि २७ bombay army रेगीमेंट , जी महार रेजिमेंट होती त्यांनी पहिल्यांदा "बोल भारत माता की जय"चा नारा दिला आणि भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढयात भाग घेतला . हे वाचून एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की असा लढा त्यांनी हिंदू शोषण करणार्यांविरुद्ध का नाही दिला आणि त्याचे एकच कारण आहे आणी ते म्हणजे देवाची भीती जी वर्षानोवर्ष त्यांच्या मनावर लादली गेली. परंपरे मध्ये आणि पापपुण्याच्या भीतीमध्ये अडकले गेले . कारण १८ आणि १९व्या शतकात फ्रेंच revolution नंतर युरोप रशिया चीन आणि सगळ्या जगात समानतेचे वारे पसरत होते पण भारतातील शोषित दलितांनी एकही उठाव केला नाही . बाबासाहेब नसते तर कदाचित आजही तो समाज पायाखालची धूळ म्हणूनच राहिला असता .

बाबासाहेबांनी संविधान मध्ये तरतूद करून शिकण्याची एक संधी या समाजाला दिली पण ६ Dec १९५६ ला बाबासाहेबांच्या मृत्युनंतर त्यांची धुरा सांभाळणारा एकही नेता या समाजात तयार झाला नाही. जे काही नेते झाले त्यांनी स्वतःची झोळी भरून घेतली आणि इतर राजकीय पक्षांनीही vote bank म्हणून या समाजाचा पुरेपूर फायदा घेतला . हल्ली वेमुला आणि कन्हैया कुमार सारखे सुशिक्षित तरुणही CPI च्या नादाला लागलेत . बाबासाहेबांनी कधीही communism ला पाठींबा दिला नाही.बाबासाहेब हे नेहमीच समान नागरी कायद्याच्या बाजूने होते जे नेहरू ,राजेंद्र प्रसाद सारख्या ब्राह्मणांना मान्य नव्हते . अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे बाबासाहेब Democratic socialism च्याच बाजूने होते आणि communist dictatorship च्या विरुद्ध होते . काश्मीरच्या article ३७०च्या विरुद्ध होते हे दलित समाजाने समजून घ्यायला पाहिजे .

खरे तर आरक्षण मध्ये वेगळ्या colleges ची मागणी असायला पाहिजे कारण IIT सारख्या colleges मध्ये study pressure आणि inferior complexion मुळे दरवर्षी एकतरी आत्महत्या होते . बाबासाहेबाच्या खाजगी library मध्ये ५०००० पुस्तके होती आणि त्यांनी without reservation आपले शिक्षण पूर्ण केले ही गोष्ट दलितांनी नेहमीच लक्षात घ्यायला पाहिजे आणि शक्यतो आपल्या मुलांना reservation बद्दल माहिती न देता competition मध्ये उतरावयाला पाहिजे कारण असे बरेच दलित आहेत की ज्यांना reservation ची गरज आहे . शासकीय नोकऱ्या शक्यतो टाळायला पाहिजे कारण तिथे प्रगती होऊ शकत नाही.USA सारख्या देशातही आजही काळे गोरे हा लढा चालूच आहे . बाबासाहेबामुळे दलितांना १९५०पासून reservation आणि अभय मिळालंय पण  USA मध्ये civil rights act १९६४ मध्ये पास झाला. काही सुशिक्षित दलित social media वर हिंदू समाजाची टिंगल उडवताना दिसतात ते टाळून त्यांनी स्वतःची वैचारिक आणि आर्थिक प्रगती कशी होईल या कडे लक्ष द्यायला हवे. आजचा जो General category चा  विद्यार्थी आहे तो  त्याच्या पूर्वजांनी केलेल्या पापासाठी जबाबदार नाही आणि त्याच्यावर अन्याय होतंय हे त्याला आवडत नाही हेही समजून घ्यायला हवे.

भारतीय नागरिकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे कि एक समाज जर मागे राहिला तर कालांतराने Revolution अटळ आहे आणि Revolution हे नेहमीच हिंसक असतात . अशी वेळ भारतात न येवो हीच प्रार्थना

भारत माता की जय

(I know many people may not like this article because of various reason.I am responsible for what i write and not for what you understood)

Thank you for reading and please comment what you misunderstood