आज महाराष्ट्रात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यापूर्वी कधी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीव्यतिरिक्त नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल इतकी उत्सुकता मला नव्हती आणि इतर सामान्य नागरिकांनाही असेल असं वाटत नाही. पण Demonetisation नंतर निवडणुकीत मोदींच्या बाजूने निकाल लागतोय की विरुद्ध याचं कुतूहल सगळ्यांना होतं. विशेषतः भारतातील political analysis करणार्यांना तर नक्कीच होतं.
पंतप्रधान मोदींच्या Demonetisation च्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि ते जाहीररीत्या announce करायला मला नक्कीच हरकत नाही. त्यामुळे मोदींच्या बाजूने निर्णय व्हावा असं वाटत होतं आणि तसंच झालं यामुळे सुखावलो. Demonatisation is good or bad आणि whether it's successful or not यावर एक लेख लिहिणार होतो पण राहून गेलं.
पण या निवडणुकीत Demonetisation च्या मुद्द्याव्यतिरिक्त एक मुद्दा असा होता की शिवसेना जिंकेल की भारतीय जनता पार्टी जिंकेल. I was confused.
Demonetisation च्या बाजूने निकाल हवा असेल तर obviously भारतीय जनता पार्टी(भाजप )जिंकायला हवी पण मनात कुठेतरी मुंबईत शिवसेना जिंकावी असंही वाटत होतं. गेली २५वर्ष युती असल्यामुळे असा संभ्रम कधीही नव्ह्ता. दोन मताने का होईना शिवसेना मुंबईत एक नंबरला आली हेही नसे थोडके .
मी पक्का शिवसैनिक आहे असं काही नाही पण कुठेतरी शिवसेनेमुळे आपल्याला नोकरी मिळाली हे विसरू शकत नाही . ३० वर्षांपूर्वी मुंबईत बँक असुदे अथवा LIC असुदे किंवा कुठलीही सरकारी ,निमसरकारी नोकरी असुदे , South Indians ची majority होती.शिवसेनेच्या स्थानिक लोकाधिकार समिती च्या आग्रही भूमिकेमुळे मराठी माणसाला ८५%नोकऱ्या मिळाल्या.
१९९२ च्या हिंदू मुस्लिम दंग्यातही बाळासाहेबांच्या आदेशावरून हिंदू विशेषतः मराठी माणसाने मुंबईचं रक्षण केलं हे सत्य आहे.बाळासाहेबांनी मराठी अस्मिता मुंबईत जागवली आणि आपण सर्व मराठी बांधव मुंबईत सन्मानाने राहू लागलो . अर्थात नंतर votebank politics मध्ये मराठीसह हिंदू राजकारण चालू झालं हेही तितकंच खरं आहे. बाळासाहेबांच्या भाषणात शिवाजी महाराजांचा आवर्जून उल्लेख असायचा आणि त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला आपण शिवाजीचे मावळे आहोत असं वाटायचं .
शिवसैनिकामुळे म्हणा किंवा शिवाजी महाराज्यांच्या आशीर्वादाने म्हणा पण मुंबईत महिला सुरक्षित आहे . भारतात मुंबई इतकं महिलांसाठी सुरक्षित कुठलही शहर नाही आणि त्यात शिवसैनिकांचा आणि महाराजांची नेहमीच आठवण करून देणाऱ्या शिवसेनेचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे.
बाळासाहेब असेपर्यंत शिवसैनिक आहे हे म्हणायला अभिमान वाटायचा तसा उद्धव च्या कारकिर्दीत वाटत नाही . गुजराती मारवाडी आणि व्यापारी भाजपसोबत युती झाल्यावर शिवसेनेचा मराठीचा मुद्दा Backseat वर गेला. मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या मेहेरबाणीने भाजप लहान भावाच्या भूमिकेतून बाहेर पडून जुळ्या भावाच्या भूमिकेत आली.
या निवडणुकीत २०१४ च्या मोदी लाटेचा प्रभाव किती राहिलाय या कडेही सगळ्यांचं कुतूहल होतं आणि तो प्रभाव कायम आहे हे निकालावरून स्पष्ट झालं आहे. भारतात केंद्रात सध्यातरी मोदींसारख्या नेतृत्वामुळे भाजप शिवाय दुसरा पर्याय नाही पण मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्रात शिवसेनाही प्रबळ असावी असं माझं वैयक्तिक मत आहे .
जय हिंद !
जय महाराष्ट्र !!!