Tuesday, 22 March 2016

RSS is Changing

"

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतात सगळीकडे RSS ,म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चर्चा जोरदार सुरु झाली .त्या निमित्ताने ………

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली असली तरीही उच्चभ्रू सुशिक्षित लोकांच्या व्यतिरिक्त  भारताच्या खेड्या पाड्यात राहणार्यांना  किंवा  शहरातील सर्वसामान्यांना  RSS बद्दल जास्त काही माहिती नव्हती.   १९६६ साली बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत मराठी माणसाच्या अस्मितेसाठी  शिवसेनेची स्थापना केली  आणि नंतर हे हिंदू राष्ट्र व्हावे हि श्रींची इच्छा अश्या घोषवाक्यांनी  काही वर्षातच शिवसेना  आणि शिवसेनेच्या शाखा महाराष्ट्रात खेड्यापाड्यात सगळीकडे पसरल्या. जे RSS ला ५०-६० वर्षात जमले नाही ते शिवसेनेने ५-१० वर्षांत निदान महाराष्ट्रात तरी कमवले .  भारतात इतर राज्यातही   स्थानिक राजकीय पक्ष बळकट झाले  पण  RSS एव्हडी जुनी संस्था असूनही १९८० पर्यंत सर्वसामान्यांपर्यंत  का पोहचू शकली नाही?


शाळेत इतिहासात भारतीय स्वातंत्र लढयाची माहिती शिकत  असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थेसंबंधित काहीही वाचनात आले नाही कारण"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटीश विरुद्ध भारतीय लढयात कधीही भाग घेतला नाही "

मग RSS ची स्थापना का झाली असावी ?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इतिहास बदलणार आहे कां ?


आजपासून १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९१६ मध्ये गांधीजी साउथ आफ्रिकेत  ब्रिटिशांविरुद्ध लढा देवून भारतात आले तेंव्हा भारतात लोकमान्या व्यातिरिक्त प्रभावी नेतृत्व करणारे कोणीही नव्हते .  काही भारतीय A O Hume ने १८८५ मध्ये स्थापन केलेल्या Indian National Congress (INC) च्या माध्यमातून  उच्चशिक्षित भारतीयांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते . कॉंग्रेसचे  सभासद बहुअंशी हिंदू  असल्यामुळे मुस्लिमांनी १९०६ साली ढाका मध्ये  मुस्लीम लीग  ची स्थापना केलीहोती.हिंदू मुस्लिम एकत्र नव्हते . 

१९१९मधील जालिअनवाला बाग हत्याकांडानंतर गांधीना  ब्रिटिशा विरुद्ध लढा देण्यासाठी Non Cooperation Movement चालू करायची होती आणि त्यासाठी त्यांना हिंदू आणि मुस्लिम एकत्र हवे होते .





त्याच वर्षी १९१९ मध्ये मुस्लिमांची ब्रिटीश विरुद्ध खिलाफत चळवळ चालू झाली होती

खिलाफत चळवळ आणि त्याचे परिणाम 

तुर्कीचा खिलाफत म्हणजे मुस्लिमांचा पोप.Ottoman Empire म्हणजे खालील नकाशात दाखवलेल्या सगळ्या मुस्लिम  देशांचा मिळून असलेला प्रदेश. ब्रिटिश Allies नी World War १(१९१४-१९१९) जिंकल्यानंतर Ottoman empire ची विभागणी केली.  तिकडे  ब्रिटिशallies  नीTurkey मध्ये खलिफा पदवी कायमची बंद केली . (आज ISIS च्या Abu Bakr al -Bagdadi  या स्वयंघोषित खलिफाची हिंसक चळवळ  याच ottoman empire शी संबंधित आहे.)

Divided ottoman empire countries  with year of independence 
त्याचे पडसाद भारतात उमटले  . Oxford Educated अली ब्रदर्स नी इतर  सुशिक्षित मुस्लिमांना (मौलाना अब्दुल कलाम आझाद,अब्दुल गफार खान वगैरे  )एकत्र करून खिलाफत कमिटी बनवली आणि ब्रिटीश विरुद्ध आंदोलन छेडले . गांधीना Non Cooperation Movement साठी मुस्लिमांची गरज होती म्हणून त्यांनी खिलाफत चळवळी ला पाठींबा दिला . पण खीलाफती मुस्लिमांनी केरळमध्ये मलबार विभागात १,००,००० हिंदू ब्राह्मणांना त्रास दिला. काहींना मुस्लिम बनवले आणि काहींना  मारून टाकले . आजही मलबार विभाग मुस्लिम आहे . गांधीना खिलाफत चळवळीला पाठींबा दिल्याचा पश्चाताप झाला आणि चौरी चौरा आग प्रकरणानंतर Non Cooperation Movement मागे घेतली .
या चळवळीत मौलाना अब्दुल कलम आझाद ,अब्दुल गफार खान आणि इतर काही अहिंसक मुस्लिम गांधीचे अनुयायी झाले. गांधीजींच्या Non Cooperation Movement मुळे भारतातील सर्वसामान्य माणूसही स्वातंत्र्य लढयात सामील झाला . याच काळात वेगळ्या पाकिस्तान च्या मागणीला अंकुर फुटला.

 हिंदू ब्राह्मणांना, गांधीनी मुस्लिमांचा पाठींबा घेतल्याचे जराही आवडले नाही. आणि १९२०मध्ये सावरकर,मदन मोहन मालविया ,लाला लजपत रॉय ,बाळकृष्ण मुंजे,केशव हेडगेवार  यांनी मिळून अखिल भारतीय हिंदू महासभेची स्थापना झाली. त्यानंतर हिंदू महासभेने गांधीच्या आणि कॉंग्रेसच्या  कुठल्याही चळवळीत भाग घेतला नाही. हिंदू महासभेला गांधींचे आणि कॉंग्रेसचे  विचार कधीही पटले नाही .हिंदू महासभेने जहाल मतानुसार ब्रिटिशाना लढा दिला .

त्या अखंड भारताच्या काळात हिंदू मुस्लिम दंगली वारंवार व्हायच्या . हिंदूना एकत्र आणून हिंदुचे  आणि हिंदू  संस्कृती चे संरक्षण करण्यासाठी केशव बळीराम हेडगेवार यांनी१९२५ साली हिंदू महसभेतुन बाहेर पडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची  स्थापना केली. या संस्थेने कधीही राजकारणात भाग घेतला नाही.

 RSS चे सगळे पदाधिकारी  चित्पावन  ब्राह्मण होते. पेशवे सुद्धा चित्पावन ब्राह्मण होते. चित्पावन म्हणजे क्षत्रिय गुणधर्म असणारे. तेंव्हाचे चित्पावन ब्राह्मण म्हणजे टिळक ,गोखले ,आगरकर ,कर्वे ,सावरकर ,रानडे, भावे हे सगळेच हिंदू जाती व्यवस्थेच्या अस्पृश्य प्रकाराच्या विरुद्ध होते .RSS ने भारतात सगळीकडे शाखा काढल्या. शाखेचे सभासद सगळ्या जातींचे हिंदू होते .  आत्ताचे दलित हेही तेंव्हा हिंदूच होते . शाखेत अस्पृश्यता नव्हती .शाखेत गणवेशधारी शिस्तप्रिय सेवक हिंदू समाजाचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी तयार होत होते .

१९४०साली गोलवलकर गुरुजी संघाचे सरसंघचालक झाले.अखंड भारत म्हणजे हिंदुराष्ट्र आणि हिंदू  संकृती चे संरक्षण  हे एकच व्रत होते . संघ इतका शिस्तप्रिय आणि राष्ट्रवादी होता कि त्याची तुलना इटलीच्या मुसोलिनी आणि जर्मनी च्या हिटलर बरोबर व्हायला लागली . गोळवलकर गुरुजी स्वयंसेवकांना देशप्रेम आणि राष्ट्रवाद समजवताना इटली आणि जर्मनी चे उदाहरण द्यायचे . ब्रिटीश गेले नाही तरी चालेल पण हिटलरने  जसे ज्यू लोकांना देशाबाहेर हाकलले तसे भारतातून मुस्लिमांना बाहेर हाकलून द्यायचे हेच लक्ष होते .

संघाच्या गणवेशाची चर्चा हि मुसोलिनी च्या राष्ट्रवादी फासीस्त पार्टी सोबत व्हायला लागली . संघाची हाल्फ चड्डी खाखी रंगाची आणि फासिस्त पार्टीची काळ्या रंगाची. गोलवलकर गुरुजी मुसोलिनी आणि हिटलरला जावून भेटल्याचीही चर्चा आहे .



देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर काश्मीरच्या हिंदू राजाला भारतात विलीन होण्यास राजी करण्यासाठी सरदार पटेलांनी गुरुजींना काश्मीरला पाठवले होते .

स्वातंत्र्य भारताची राज्यघटना लिहिण्याची वेळ आल्यावर संघाला राज्यघटना मनुस्मृती धर्मशास्त्र आधारे हवी होती. मनुस्मृती मध्ये शुद्र आणि महिलांवर आधारित विशेषत; दलितांसाठी  जे कायदे आहेत ते एकदम खालच्या दर्जाचे असल्यामुळे आंबेडकरांनी अमान्य केले . संघाला भारताचा तिरंगी झेंडाही  मान्य नव्हता.गांधीजींच्या हत्येनंतर शाखेत पेढे वाटले होते .त्यानंतर संघावर बंदी आली होती . पण नंतर गांधीहत्येमध्ये  संघाचा काहीही संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यावर काही अटींवर संघाची बंदी उठवण्यात आली . देशासाठी आपले आयुष्य दिलेल्या ७९ वर्षांच्या निशस्त्र वृद्ध महात्म्याला मतभेदांवरून गोळी मारणे हे सर्वसामान्यांना मान्य नव्हते .गांधीजींच्या हत्तेनंतर  सर्वसामान्य जनता संघापासून दूरच राहिली.

भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी हिंदू मुस्लिम दंगलीत संघकार्यकर्त्यांनी पंजाबमध्ये  हिंदुना वाचवण्यासाठी अहोरात्र सेवा केली . १९५१मध्ये संघाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी ,दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेई यांनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. पण १९५२ च्या भारताच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंजाबमध्ये एकही उमेदवार निवडून आला नाही आणि जनसंघाला भारतात एकूण ३ जागांवर समाधान मानायला लागले.

स्वातंत्र्यानंतर संघाने केलेल्या समाजसेवेची यादी 


१९६०साली गोवा,दादरा आणि नगर हवेली पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यामध्ये संघ कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर १९६२ साली भारत चीन युद्धाच्यावेळी संघकार्यकर्त्यांची कामगिरी बघून पंतप्रधान  पंडित नेहरूंनी १९६३च्या प्रजासत्ताकदिनी संघाला परेडमध्ये भाग घ्यायला बोलावले. १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी लाल बहादूर शास्त्रींनी संघाला दिल्लीचे ट्राफिक सांभाळायला दिले आणि  पोलीसांना  लढायला पाठवले . त्यानंतर १९७१ओरिसा १९७७ आंध्र चक्रीवादळ,१९८४ भोपाल त्र्याजेडी आणि अशा सगळ्या नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संघकार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी केली. पण तरीही जनतेने कॉंग्रेसला नेहमीच निवडून दिले.
१९८० साली  भारतीय जनता पार्टी ची स्थापना झाली  आणि RSS  च्या राजकीय  प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली .१९८४ मध्ये पंतप्रधान  इंदिरा गांधी ची हत्या झाल्यावर कॉंग्रेसची एकच लाट पसरली त्यामुळे १९८४ च्या भाजपच्या  लोकसभेच्या  पहिल्याच निवडणुकीत २ जागांवरच समाधान मानायला लागले पण त्यानंतर १९८९ च्या लोकसभेला ८५ जागा मिळवून  २०१४ च्या निवडणुकीत २८२ जागांपर्यंत मजल मारली आणि RSS चर्चेचा विषय बनली .

कॉंग्रेसच्या ५०वर्षांच्या शासनाला कंटाळून आणि नरेंद्र मोदींच्या प्रभावी व्यक्तिमत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले . भारतीय जनतेला यापुढे तरी सध्या BJP शिवाय पर्याय नाही . पण संघाला यादरम्यान स्वतःला सिद्ध करण्याची आणि भारतीय जनतेला आपलसं करण्याची संधी चालून आली आहे .
भारतीय जनता जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात सगळ्या धर्माचे लोक येतात .हिंदू ८०%आहेत पण मुस्लीम १५% आणि ख्रिस्चेन २. ३%आहेत. फाळणीच्यावेळी भारताला आपली भूमी मानणाऱ्या मुस्लीम समाजात काही मुठभर भारतविरोधी असतीलही पण A P J अब्दुल कलाम ,जावेद अख्तर सारखे देशप्रेमीही आहेत .

नरेंद्र मोदींच्या हल्लीच्या जागतिक सुफी  सांप्रदायच्या  सभेत जे भाषण केले त्यातून BJP चा मुस्लिम समाजा बद्दल चा दृष्टीकोन बदलल्याचे दिसते आणि भारतीय मुस्लीम समाजाने त्याचे स्वागतही केले . 

नरेंद्र मोदींनी जगात मंदी असतानाही शेतकर्यांना आणि नव व्यवसाय सुरु करणाऱ्या तरुण पिढीला एकत्र घेऊन विकासाच्या दिशेने जी पावले उचलली आहेत ती देशाला नक्किच शिखरावर नेईल.  पण हे करत असताना संघाला आत्मपरीक्षण करून  परिवर्तन करण्याची गरज आहे .

संघाचे जे पूर्णवेळ प्रचारक आहेत ते उच्चशिक्षित गोल्ड मेडालीस्त आणि ब्रह्मचर्याचे पालन करणारे आहेत. भावी सरसंघचालक हा त्यापैकीच एक असणार. सरसंघचालक आजन्म असतो अथवा स्वेच्छा निवृत्ती घेऊ शकतो . यात Dictatorship येऊ शकते .

संघाचे MISSION
 For the welfare of entire mankind, Bharath must stand before the world as a self-confident, resurgent and mighty nation.


संघाने महिलांना कुठल्याही मंदिरात जाण्याची बंदी नसल्याचे सांगितले पण संघात महिलांची शाखा नसते आणि संघाच्या कार्यकारिणीत (managing committee) एकही महिला नाही.

संघाच्या internet site वर गेल्यावर अखंड भारताचा नकाशा दिसतो आणि त्यावर गोलवलकर गुरुजींच एक वाक्य दिसतं आणि मला हिटलर आठवतो .



१९१९ मध्ये पहिल्या महायुद्धानंतर Treaty ऑफ Versailles मध्ये जर्मनीचा काही भाग(skyblue ) गमावला जातो. आणि नंतर काही वर्षांनी जू लोकांना बाहेर हाकलून ,गमावलेला जर्मनीचा भाग परत मिळवण्याच्या नादात दुसऱ्या महायुद्धात १९४५ मध्ये, अगोदर असलेला काही भागही(green and yellow) जर्मनी गमावून  बसतो .



मला पाकिस्तान आणि बांगलादेश मिळवण्याच्या नादात काश्मीर, पंजाब आणि ईशान्य भारत गमवायचा नाही .


गुरुजींच्याच शब्दात सांगायचे तर There is, in fact, no such thing as a SETTLED FACT in  this world . 
बदलायचेच असेल तर मनुस्मृती मधील वादग्रस्त कायदे जे महीला आणि दलितांच्या साठी घातक आहेत ते बदला . जगातील सगळ्यात मोठी संस्था आहे RSS आणि हिंदूची एकमेव भारतीय संघटना . जर आपण ५०० वर्षजुनी बाबरी मशीद तोडून राम मंदिर  बांधू शकतो तर २३०० वर्षापूर्वीच्या मनुस्मृतीत बदल नक्कीच करू शकतो . संघाला ते अधिकार नक्कीच आहेत .आपल्याच बांधवाना २३०० वर्ष अस्पृश्य ठेऊन त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्याची जबाबदारी कोणीतरी घेतलीच पाहिजे .

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी  आदेश देऊन समस्त हिंदू बांधवाना सांगितले पाहिजे कि जा आणि आपल्या त्या दलित बांधवाना हात जोडून बोला

"बांधवा माझ्या पूर्वजांनी तुझ्यावर जे अन्याय केले आहेत त्यासाठी मी स्वतःला गुन्हेगार समजतो आणि तुझी हात जोडून माफी मागतो"

भारत माता कि जय 
जय हिंद 
वन्दे मातरम 





http://rashtriyasewa.org
http://www.rss.org/

Thank you for reading
Please comment your precious first thought after reading this article.






Thursday, 10 March 2016

INTRODUCTION

 बऱ्याच दिवसांपासून एक ब्लॉग बनवण्याचा विचार डोक्यात चालू होता पण मुहूर्त मिळत नव्हता .  तसा मी tech savvy आहे . म्हणजे facebook ,twitter ,linkedin वर अगदी पहिल्यापासूनच आहे पण blog चा विचार डोक्यात आला नाही . पण हल्ली डोक्यातले विचार लिहूल काढावेसे वाटायला लागले आणि Blog बनवायचे ठरवले .

आता मराठीत लिहायचे कि english मधे ?मराठी बोलीभाषा असली तरी लिहिण्यासाठी आपण लेखक नाही आणि मराठी वाचनही बऱ्याच वर्षांपासून पेपर व्यतिरिक्त नाहीच . लहानपणी म्हणजे १० वी च्या मे महिन्यापासून कॉलेज मधून बाहेर पडे पर्यंत वि स खांडेकर ,रणजीत देसाई आणि पु ल देशपांडे सारख्या मात्तबर लेखकांच्या सगळ्या कादंबऱ्या वाचून काढल्या आहेत . पण नोकरीला लागल्या पासून english ची गरज जाणवायला लागली आणि इंग्लिश सुधारण्यासाठी  english newspaper वाचायला सुरवात केली आणि मराठी वाचनाचा संबंध तुटला .हल्ली whatsapp वर मराठी लेख आणि कविता वाचताना हवेची झुळूक आल्यासारखे वाटते . त्या नंतर जे वाचन झाले ते english मधूनच .  पूर्वी management ची पुस्तके वाचायचो आणि हळू हळू harry potter पर्यंत पोहचलो . Harry potter वाचत असताना एक विचार डोक्यात आला कि मराठीत दिग्गज साहित्यिक असूनही  J K Rowling सारखे world famous कुणीच कसे झाले नाही. तसे Naipaul ,Kiran Desai ,Jumpa Lahiri आणि मराठी किरण नगरकर  सारखे  भारतीय लेखक आहेत पण मोजकीच .

वाचन हा माझा छंद आहे . कुठल्याही विषयावर वर मला वाचायला आवडते . Fiction ,म्हणजे काल्पनिक आवडत नाही पण Harry Potter आणि Lord of the rings आवडले . Autobiography वाचायला खूप आवडते . Wikipedia मुळे तर एकदम सोयीस्कर झालंय आणि तेही mobile वर . Smartphone मुळे दुनिया मुट्टी मे झाली आहे .दिवसातले ३-४ तास तरी मी नक्की वाचतोच . शाळेत असताना History  जराही आवडले नाही पण आता वाचायला मजा  येते .  In fact वाचल्या शिवाय करमत नाही . अगदी Socrates,Plato पासून second world war पर्यंत आणि वेदांपासून स्वातंत्र्यापर्यंत सगळंच वाचतो .बऱ्याच वेळा लक्षात रहात नाही पण पुन्हा पुन्हा वाचतो .  असं वाटतं  हे सगळं आधी आवडले असते किंवा वाचले असते तर बरं झालं असतं . तसा मी सायन्स student पण चुकून विम्याच्या व्यवसायात आलो आणि झोपडपट्टी पासून पेडर रोड वर राहणार्यांशी संबंध आला आणि बरच शिकायला मिळाले .

तसा मी spiritual आहे पण अगदीच हिंदुवादी नाही . देवळात जातो आणि St Mary चर्च ला पण जायचो पूर्वी कधी कधी . Church मध्ये चप्पल घालून जातात हे खटकायचे . मोहमद पैगंबर बरोबर पण आपलं काही crossing नाही . कुराण आणि Bible वाचायचे आहे . भगवान बुद्धांची शिकवण आवडते . पण सगळ्यात जास्त मला कृष्ण आवडतो . गीता बऱ्याच वेळा वाचली पण पाठ झाली नाही . कृष्ण practical आहे ज़से जमेल तशी भक्ती करण्याची मुभा आहे. कसं जगावं आणि वागावं हे अगदी बरोबर सांगितलं आहे . TV वर हल्ली महाभारत serial होती ती मी youtube वर without break पहिली फक्त कृष्णासाठी . सगळ्यांनी आवर्जून पहावी .

समाजसेवा करण्याची इच्छा आहे आणि निवृत्ती नंतर झोकून द्यायचे ठरवले आहे समाजसेवेला . CRY foundation सारख्या संस्थाना donation द्यायचो पण नंतर लक्षात आले कि समाजसेवेच्या नावाखाली पैसे छापतात . म्हणून गेल्या ३-४ वर्षांपासून बायकोच्या सांगण्यावरून मोलकरणीच्या ३ लहान मुलांचा शाळेचा आणि सगळा खर्च आम्ही करतो आणि समाजाचे लेणे फेडण्याचा प्रयत्न करतो . त्या मुलांसाठी रोज अर्धा लिटर दुध देतो आणि अधून मधून खीर biscuits किंवा काहीही बनवून पाठवतो . त्या मुलांच्या वाढदिवसाला माझी बायको त्यांना mall मध्ये घेऊन जाते आणि McDonald वगैरे मध्ये खायला आणि games zone मध्ये खेळायला घेऊन जाते . आमचं बघून आमच्या सोसायटी मधील आणखी काहीजणांनी असं करायला सुरवात केली आहे . जमलं तर तुम्हीही  करा.

प्रस्तावना जरा जास्त मोठी झाली . बरंच लिहायचं आहे वेगवेगळ्या विषयांवर . समाजातल्या घटनांवर आणि चालीरीतींवर . आपण आपले विचार मांडायचे . कोणाला आवडतील कोणाला नाही पटणार . विचार वेगळे असायलाच पाहिजे त्यातच जगण्याची मजा आहे . आपण फक्त धर्माच्या (TRUTH) बाजूने असावे हि काळजी घ्यायची .
Please तुमच्या comments नक्की द्या .
Thank You for reading