Thursday 5 May 2016

SAIRAT

सैराट पहिला …. मला आवडला. नैसर्गिक सहज सुंदर अभिनय.  कुठलाही फिल्मी आव अभिनयात भाषेत आणि खतेतर कशातच नाही . नागराज मंजुळे टच संपूर्ण चित्रपटभर जाणवत राहतो. संगीत लोकप्रिय होण्यासारखेच आहे. खेड्यातले वातावरण हवेहवेसे वाटते. परश्या अर्ची आणि त्यांचे संकटातही बरोबर राहणारे मित्र मैत्रिणी सगळ्यांचीच कामे अफाट. सगळे नवीन असूनही अभिनयात कुठेही नवखे वाटत नहित. छायाचित्रण नेत्रसुखद .  चित्रपटाची लांबी थोडी जास्त झाली आहे. कदाचित कमी करता आली असती. कधी कधी ते जाणवते पण कंटाळा येत नाही.  चित्रपटात पक्षांच्या थव्याचा वापर मला खूप भावला. तो घटनांचा परिणाम वाढवतो. शेवटचा धक्का नागराज मंजुळेचाच. शेवटची भयाण शांतता जीवघेणी वाटत राहते आणि मनावर ठसे उमटवून जाते. Fandri चा शेवटही माझ्या अंगावर आला होता. Fandri च्या फेकलेल्या दगडाने तेंव्हाही मला खोक पडली होती आणि आजही सैराट बघून मी अस्वस्थ झालो आहे.



सैराट येण्याआधीच promo बघून काही प्रतिक्रिया आल्या होत्या त्याविषयी बोलायाचं तर तारुण्यातील प्रेमाची भावना मला नैसर्गिक वाटतात आणि या चित्रपटामुळे तरुण मुलामुलींवर वाईट परिणाम होतील असे मला अजिबात वाटत नाही. खरंतर प्रेमाचा उल्लेख झाला कि बासुरीवाला कान्हा आणि राधा आठवते.कृष्ण हा असाही माझा आवडता. बलरामाने आपल्या बहिणीचा सुभद्रेचा विवाह आपल्या आवडत्या शिष्याबरोबर म्हणजे दुर्योधनाशी करण्याचे ठरविले तेंव्हा कृष्णानेच अर्जुनाला स्वतःच्या बहिणीला म्हणजे सुभद्रेला पळवून न्यायला सांगितले. पण अर्जुनाने सुभद्रेला पळविले तर कौरव आणि पांडवात युद्ध होईल म्हणून सुभद्रेला रथ हाकायला सांगितले आणि असे दर्शविले की सुभद्रेने अर्जुनाला पळविले. त्यामुळे प्रेमिकांनी पळून जाण्याचे  आणि पळवून नेण्याचे प्रशिक्षण(उपदेश) तसे आपल्याला श्रीकृष्णानेच दिले आहे आणि त्यामध्ये पाश्चिमात्य  देशांना  किंवा चित्रपटांना दोष देणे चुकीचे आहे असे मला वाटते.


 प्रेम कितव्या वर्षी करावे ? आपल्या दोन तीन पिढ्या  आधी म्हणजे ७०-८० वर्षापूर्वी,वय ८-१२ वर्षाचे असताना लग्न व्हायचे आणि सर्वसाधारण १३-१८ व्या वर्षी मूल व्हायचे.त्यामुळे हेच प्रेमाचे वय असे मानायला हरकत नाही.  उदाहरण द्यायचे झाले तर३१वर्ष्यांच्या  समाजसुधारक न्यायमूर्ती रानडे नी ११ वर्षाच्या रमाबाईबरोबर लग्न केले हे आपण घरात अल्पवयीन मुलांसोबत  बसून TV मालिकेत बघतो.

Social Media वरील काही प्रतिक्रिया एव्हड्या टोकाच्या होत्या कि मलाही कुतूहल होतं की यात असं काय दाखवलंय की आपले संस्कार आणि संस्कृती धोक्यात आली. चित्रपट बघितल्यावर  मला लक्षात आले की एका पाटलाची मुलगी कोळ्याच्या प्रेमात पडली,पळून गेली ,आणि लग्न केले . हे दाखवल्यामुळे स्वयंघोषित हिंदुधर्मरक्षणकर्त्यांना  संस्कृती धोक्यात आल्यासारखे वाटले .  म्हणून त्या काही so called स्वयंघोषित हिंदुधर्मरक्षणकर्त्यांना संस्कृती आणि संस्काराची आठवण करून द्यावी असे वाटतं .   
   
पराशर ऋषी एकदा भ्रमंती करताना यमुना नदीच्या काठी आले. त्यांनी होडी चालवणाऱ्या कोळीला नदी पार करायला सांगितले . त्या कोळ्याने आपल्या मुलीला म्हणजे मत्स्यगंधेला पराशर ऋषींना नदी पार करण्यास सांगितले. मत्स्यगंधेला बघून पराशराची नियत खराब झाली आणि त्यांनी त्या कोळ्याच्या मुलीचा विनयभंग केला. ती मत्स्यगंधा, म्हणजे सत्यवती गरोदर राहिली आणि तिने  एका काळ्या मुलाला जन्म दिला. काळ्या रंगामुळे त्या मुलाचे नाव कृष्ण आणि नदीकाठी जन्मल्यामुळे द्वयपायण असे होते. त्याच मुलाने नंतर वेदांना तीन भागात विभागले त्यामुळे त्यांचे नाव व्यास झाले.

आजच्या काळात एखाद्या अल्पवयीन मुलगी किंवा कुमारिका गर्भवती राहिली तर आपल्या संस्कृतीला डाग लागतो. मग तेव्हा हा डाग लागला नाही कां ?आणि त्या पराशराला काय शिक्षा झाली ? आता संस्कार म्हणायचे तर आई वडील आजी आजोबा देतात . या पराशराचे आजोबा वशिष्ट ऋषी. त्यानंतरही धृतराष्ट्र ,पंडू आणि विदुर यांचा जन्म विधवा स्त्रियाबरोबर नियोगा पद्धतीने कसा होतो आणि अश्या कितीतरी सुसंस्कृत गोष्टी आहेत.अश्याच  काही  ऋषींनी मिळून मनुस्मृती सारख्या घाणेरड्या स्मृती लिहून स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्याचे कायदे लिहून ठेवले आणि त्याला संस्कृती नाव दिले.


जे अन्यायाविरुद्ध बोलत नाही त्याला अधर्म बोलतात. जे भीष्मांनी द्रौपदी वस्त्रहरणच्यावेळी केलं.अधर्म करणार्यांमध्ये  द्रोनाचार्यासारखे गुरुही होते ज्यांनी स्वतःच्या ध्येयासाठी द्रुपद ला हरवण्यासाठी अर्जुनाला शिकवले आणि एकलव्य आणि कर्णावर अन्याय केला. कर्ण ज्याने अधर्मी दुर्योधनाची साथ दिली.अशाच सगळ्या अधर्मी विरुद्ध महाभारताचे युद्ध झाले आणि श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वकीयाविरुद्ध लढायला सांगितले आणि अधर्माचा नाश केला .

बरेचसे पालक आपल्या मुलांना सैराटला  नेत नाही कारण त्यांच्यावर वाईट परिणाम होईल. पण खरं तर हा चित्रपट पहिला तर कोणीही पळून  जाताना विचार करतील . कारण मध्यंतरानंतर चित्रपटात , पळून गेल्यावर काय होऊ शकते आणि कसा पश्चाताप  दोघांनाही होतो हे दाखवलंय. पण आपण उगाजच पळून गेली आणि प्रेमात पडली या गोष्टीना आणि जातीव्यवस्थेला तडा गेल्यावर संस्कृतीच्या नावाने बोंबलत बसतो . 

मला अभिप्रेत असलेली संस्कृती म्हणजे भाषा ,कला ,संगीत ,नृत्य ,पोशाख , साहित्य(literature) आणि शिष्टाचार(respect to elder ,नमस्ते ). आपल्या शालेय शिक्षणात या गोष्टी शिकवल्या जात नाहीत . आपल्यापैकी किती जणांना आपला मुलगा किंवा मुलगी कला,संगीत अथवा नृत्य या क्षेत्रात जावे असे वाटते ?कथा कादंबरी कविता लिहिणारे तर दिसतच नाही .योगाभ्यास आणि कामसूत्र या भारतीयांच्या देणग्या आहेत. ज्याचे  अनुकरण आपल्या देशापेक्षा पाश्चिमात्य देशातच अधिक झाले . 

कालानुरूप globalisation आणि migration मुळे संस्कृतीत बदल होत गेले हे निश्चित पण ते साहजिकच आहे . साधारण ५०-६० वर्ष्यांपूर्वी आपले आजोबा आजी ९वारी साडी आणि धोतर नेसायचे .आणखी १००वर्ष मागे गेलो तर पेशव्यांच्या काळातले पोशाख वेगळे होते. त्यामुळे यापुढेही पोषाखामध्ये आणि इतर बदल हे होणारच हे समजायला पाहिजे. पूर्वी १६ व्या वर्षी लग्न व्हायची नंतर २१ व्या वर्षी त्यानंतर २८-३० व्या वर्षी लग्न व्हायला लागली . पुढची पिढी कदाचित ३२-३५-४०व्या वर्षी लग्न करतील. पण तोपर्यंत प्रेम आणि शारीरिक संबंध असणार नाहीत असे असू शकते का?

नैसर्गिक गोष्टीना थांबवू शकत नाही पण त्यावर उपाय नक्कीच करू शकतो.पालकांनी स्वतः ही जबाबदारी घेतली पाहिजे.हल्लीच २ state हा आलिया भट्ट आणि अर्जुन कपूरचा यांचा चित्रपट आला होता त्यात आलिया भट्ट condom घेऊन अर्जुन कपूर च्या रूम मध्ये जाते.मुलांच्या bags आणि mobile तपासायचे बंद करा बरेचसे problem solve होतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा.

माझा मुलगा हैदराबादला hostel  मध्ये असतो. दूर असल्यामुळे काळजी वाटते . एके  दिवसी त्याचा फोन आला . कुठेतरी फार्म house वर एका मैत्रिणीची २०व्या वाढदिवसाची पार्टी होती. ५०-६०मुलंमुली  होत्या. मला बोलतो "बाबा  vodka taste केला. बिंदूने (म्हणजे त्याच्या मैत्रिणीने not girlfriend )वोडका घेतला आणि तिला झाली होती . रात्री २ वाजेपर्यत तिला सांभाळायला लागले" . मुलांवर विश्वास ठेवला तर त्यांची जबाबदारी त्यांना बरोबर समजते . आणि वोडका taste केला म्हणजे संस्कृती बिघडली असे मला वाटत नाही . तो school मध्ये पण बेस्ट student होता आणि college मध्ये पण top ५ मध्ये आहे आणि तबला उत्तम वाजवतो.
    

बदल हा आंब्याच्या कैरी सारखा असतो . सुरवातीला त्याची चव आंबट असते त्यामुळे तो आवडत नाही. नंतर काही काळाने तो गोड लागतो. आणि आणखी काही काळ गेला की त्याचे परंपरे मध्ये रुपांतर होते  आणि तोच गोड आंबा कुजायला लागतो. खरतर तेव्हा तो परंपरेचा कुजलेला आंबा  फेकून देऊन नवीन आंबा आणि बदल स्वीकारायला पाहिजे.


     
परिवर्तन ही संसार का नियम है 
जय श्रीकृष्ण राधे कृष्ण  


    


 












3 comments: